आमच्या सांकेतिक स्थळावर आपले सहर्ष स्वागत‌
कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा)
संस्थापक जनता वसतिगृह शिक्षण संस्था

जनता वसतिगृह शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. संस्कार क्षम व गतीमान समाज उभारणीसाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व ल‌क्षात घेऊन तसेच‌ सामान्यांना जीवनाची प्रभावळ सुखमंडीत व्हावी, दुरीतांचे जाऊन भौतिक सुखाचा सामान्यालाही आस्वाद घेता यावा, सुर्यप्रकाश व ज्ञानकिरण पिढ्यानपिढ्या ज्यांच्या झोपडीपर्यत गेला नाही, त्यांच्या दारी ज्ञानगंगा पोहचावी. ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार या जीवनमुल्यांची प्राप्ती व्हावी या उद्देशाने कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी जनता वसतिगृह शिक्षण संस्था स्थापना केली. सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो. टोलेजंग इमारत, प्रशस्त क्रिडांगण, स्वतंत्र प्रयोग शाळा, समृध्द ग्रंथालय, गुरुदेवाची ज्ञानदानाची तळमळ, विद्यार्थ्याचा यशस्वी व सक्रिय सहभाग यामुळे सर्वाच्या आदरास पात्र ठरलेल्या या विद्यानगरीत आपण प्रवेश घेत आहात ही आनंदाची बाब आहे.

सध्या वरिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान‌ शाखेचे पदवी वर्ग चालविले जातात. कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान‌ शाखेचे वर्ग चालविले जातात. तसेच माध्यमिक विद्यालयामध्ये ५ वी ते १० वी पर्यतचे वर्ग चालविले जातात. संस्थेने नुकतीच जँक अँण्ड जील ही इंग्लिश माध्यमाची प्रिस्कुल चालु केली आहे.

संस्थेचे उद्देश‌

  • सामान्य गरीब विद्यार्थ्यांना विशेषत: खेड्यामधील विद्यार्थ्याना वसतिगृहे,निवास व्यवस्था आणि बोर्डिंग सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • वसतिगृहाचा फायदा घेत असलेल्या विद्यार्थ्याचा शारीरिक आणि नैतिक विकास करणे.
  • विद्यार्थ्यामध्ये प्रेम व मैत्री जोपसण्याची भावना निर्माण करणे आणि त्यांना देशाचा शिस्तप्रिय नागरिक होण्यास मदत करणे
  • विद्यार्थ्याना अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीची पुर्तता करणे.
  • विविध खेळांच्या स्पर्धा भरविणे आणि शारीरिक शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे
  • शालेय विद्यार्थ्याना सर्वधर्म समभाव वृत्तीचे जोपसना करण्याविषयी मार्गदर्शन करणे

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | संस्थेचे युनिट ‌| उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | गँलरी |‌ चौकशी |‌ संपर्क |‌‌