जनता वसतिगृह शिक्षण संस्था

संपर्क
img1
हर घर तिरंगा अभियान
हर घर तिरंगा अभियान

हर घर तिरंगा अभियान आज 13 ऑगस्ट 2025. हर घर तिरंगा अभियानांतर्गत. जनता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य ढोबळे सर. उपप्राचार्य तिपुळे सर. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता. मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याची क्षणचित्रे

previous arrow
next arrow

जनता विद्यालय‌

इयत्ता १ ली ते १० वी

जनता विद्यालय‌

इयत्ता १ ली ते १० वी

जनता ज्युनिअर काँलेज

इयत्ता ११ वी ते १२ वी
आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स

जनता ज्युनिअर काँलेज

इयत्ता ११ वी ते १२ वी
आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स

जनता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

बी. ए, बी.कॉम, बी. एस. सी

जनता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

बी. ए, बी.कॉम, बी. एस. सी

रोडेश्वर विद्यालय

इयत्ता १ ली ते ७ वी

रोडेश्वर विद्यालय

इयत्ता १ ली ते ७ वी

जँक अँड जील प्रीस्कुल‌

प्ले ग्रुप, नर्सरी, एल. के. जी, यु.के.जी

जँक अँड जील प्रीस्कुल‌

प्ले ग्रुप, नर्सरी, एल. के. जी, यु.के.जी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित शिक्षण

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. संस्कार क्षम व गतीमान समाज उभारणीसाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व ल‌क्षात घेऊन तसेच‌ सामान्यांना जीवनाची प्रभावळ सुखमंडीत व्हावी, दुरीतांचे जाऊन भौतिक सुखाचा सामान्यालाही आस्वाद घेता यावा, सुर्यप्रकाश व ज्ञानकिरण पिढ्यानपिढ्या ज्यांच्या झोपडीपर्यत गेला नाही, त्यांच्या दारी ज्ञानगंगा पोहचावी. ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार या जीवनमुल्यांची प्राप्ती व्हावी या उद्देशाने कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी जनता वसतिगृह शिक्षण संस्था स्थापना केली. सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो. टोलेजंग इमारत, प्रशस्त क्रिडांगण, स्वतंत्र प्रयोग शाळा, समृध्द ग्रंथालय, गुरुदेवाची ज्ञानदानाची तळमळ, विद्यार्थ्याचा यशस्वी व सक्रिय सहभाग यामुळे सर्वाच्या आदरास पात्र ठरलेल्या या विद्यानगरीत आपण प्रवेश घेत आहात ही आनंदाची बाब आहे.

कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा)

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध

सुविधा

ग्रंथालय

महाविद्यालयात सुसज्ज व शांत वातावरण असलेले ग्रंथालय आहे, जेथे विविध विषयांवरील शैक्षणिक पुस्तके, संदर्भग्रंथ, मासिके आणि वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त आहे.

संगणक लॅब

आधुनिक संगणकांनी सुसज्ज असलेली प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडते. उच्चगुणवत्तेचा इंटरनेट व आवश्यक सॉफ्टवेअरसह डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाते.

विज्ञान प्रयोगशाळा

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यासाठी स्वतंत्र व अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे संकल्पना समजून घेतात व कौशल्य विकसित करतात.

प्रशस्त खेळाचे मैदान

महाविद्यालयाकडे प्रशस्त खेळाचे मैदान असून विविध मैदानी खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास साधला जातो.

सुसज्ज वर्गखोल्या

वर्गखोल्या स्वच्छ, हवेशीर व आरामदायी असून शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या आहेत. काही वर्गखोल्यांमध्ये प्रोजेक्टर व डिजिटल साधनांचाही समावेश आहे.

सुरक्षा व सीसीटीव्ही व्यवस्थापन

महाविद्यालय परिसरात सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. संपूर्ण परिसराची सतत देखरेख केली जाते.

गुणवत्तापूर्ण शिक्षण

आपल्या भविष्याचा पाया इथूनच सुरू होतो

आमचं संस्था केवळ शिक्षणसंस्था नसून, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी करणारे एक ज्ञानमंदिर आहे. आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण देण्यावर भर देतो.

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.

संपर्क

© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org