जनता वसतिगृह शिक्षण संस्था

संपर्क

जनता विद्यालय‌

मुख्यपान / संस्थेचे युनिट

आमच्याविषयी

जनता विद्यालयाची स्थापना कै.धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी १९७२ रोजी केली. गेल्या ५३ वर्षांपासून आमच्या शाळेत उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यात येत आहे आणि पुढेही त्याच्या सातत्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.

विद्यालयाचा उद्देश म्हणजे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे. एक चांगल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया मुलांच्या ज्ञानेंद्रिय, मानसिक तसेच भावनिकतेचा विकास करणे, त्या अनुभवाच्या आधारे शिक्षण आणि प्रकल्प पद्धती साध्य करता येतात. शाळा मुलांच्या प्रत्येक पैलूवर अगदी तपशीलपणे लक्ष केंद्रित करते. वर्षभरामधे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी उत्तेजन देणे, विविध उपक्रम राबविणे ही कार्ये पार पडली जातात. उदाहरणार्थ, नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देणे आणि बाल वयात शिस्त अंगीकारणे, मुलांमधून वर्गप्रतिनिधीची नेमणूक करणे. मुलांची जिज्ञासु वृत्ती जागृत करण्यासाठी सामान्य ज्ञान सारखी स्पर्धा आयोजित करणे. विविध कला उदा. संगीत आणि नृत्य यांचा परिचय करून देण्यासाठी संगीत दिवस आणि स्नेहसंमेलन यांसारखे कार्यक्रम घेण्यात येतात. गणिताची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट पद्धतीचा अवलंब करणे, भाषेच्या कौशल्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना संस्कृत आणि संवादात्मक इंग्रजी शिकवायचे धडे दिले जातात.

त्यामुळे जनता विद्यालयामध्ये परीपूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो. आमचे ध्येय आमच्या शाळेतील विदयार्थी हे आपल्या देशाचे जबाबदार व सुजाण नागरिक होणे हेच आहे. आमचा विश्वास आहे आम्ही त्यांच्या पंखामध्ये ते बळ देऊ की ते त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेतील आणि ते जे क्षेत्र निवडतील त्यामध्ये यश प्राप्त करून भविष्यातील जीवनात अनुकरण करतील.

विद्यालयामध्ये ५ वी ते १० वी पर्यत वर्ग चालविले जातात.

आवश्यक कागदपत्रे:

श्री. ढोबळे शिवाजी मारुती
श्री. सय्यद आयुब दाऊदभाई
श्री. गवळी बापू रामभाऊ
श्री. थोरवे विजयकुमार ज्ञानदेव‌
श्री. गव्हाणे संतोष रोहीदास‌
श्री. बांदल वैभव विठ्ठल‌‌
श्री. टकले संदिप हौसराव‌‌‌
श्री. गायकवाड महादेव भगवान‌‌‌‌
श्री. झांजे संदिप श्रीधर‌
श्रीमती ढवळे नीता चंद्रकांत‌‌
श्रीमती जाधव वैष्णवी हनुमंत
श्री. मोरे नितीन विठ्ठ्ल‌
श्री. एकशिंगे अशोक संभाजी‌
श्री. होळकर संदिप विठ्ठल‌‌
श्री. पठाण निजाम बिबिशन‌‌‌
श्रीमती.शेख सोनम शब्बीर
श्रीमती .ढोबळे दिपाली बाळासाहेब
श्री. अडागळे सोमिनाथ प्रल्हाद‌
श्री. सय्यद असलम स.जमीरभाई
श्री. गायकवाड बापु दत्तात्रय‌
श्री. लगड परमेश्वर बाबासाहेब‌‌
श्री. कुटे सुदाम धोंडीबा
श्री. बर्डे बाळु अजिनाथ‌
श्री. गायकवाड नामदेव दत्तात्रय‌‌
श्री. गायकवाड अंकुश कुंडलिक‌‌‌
नाव : श्री. काळे संदिप मोहन‌‌‌‌
  • पत्ता

    मु.पो.धानोरा,ता.आष्टी, जि.बीड ४१४२०२

  • फोन

    मो.९४२००२२००६ / ९६५२९७६५३

  • ईमेल

    bandalvikram@rediffmail.com

जनता वसतिगृह शिक्षण संस्था

सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.

संपर्क

© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org