संस्थेची स्थापना कै. धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांनी केली. त्यांचा उद्देश हा स्पष्ट होता — शिक्षण हे केवळ उच्चभ्रू वर्गापुरते मर्यादित न राहता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारित, सुशिक्षित आणि सशक्त समाजनिर्मितीचे स्वप्न पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी ही संस्था उभी राहिली.
ग्रामीण भागात असूनही एवढं दर्जेदार शिक्षण मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष आणि विद्यार्थ्यांविषयीची तळमळ खूप प्रेरणादायक आहे
"ही संस्था माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. इथले शिक्षक केवळ शिक्षण देत नाहीत, तर आमचं व्यक्तिमत्त्वही घडवतात. मला इथे मिळालेलं मार्गदर्शन आयुष्यभर साथ देईल."
"जनता ज्युनिअर काँलेज मला माझे सुप्त गुण शोधण्याची संधी दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यासाची शिस्त या सगळ्याचा खूप फायदा झाला."
संस्थेने मला केवळ उत्तम विद्यार्थी बनवलं नाही, तर एक चांगला नागरिकही घडवलं. आज मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा मनापासून कृतज्ञता वाटते.
सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटणारी व अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे. नव्या युगाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडविताना त्याच्या सुप्त गुणांना व कलांना येथे वाव दिला जातो.
© 2025 All Rights Reserved by janatavssdhanora.org